मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि संयम हीच यशाची चतुसूत्री- यशस्वी स्पर्धा परीक्षार्थी प्रिया पाटील
शालेय जीवनापासून व्हॉलिबॉलची साथ, कधी छंद म्हणून कुंचल्याची याद, शेतकीचे शिक्षण घेऊनही आता ती सज्ज आहे सामान्यांच्या रक्षणासाठी... ही आहे किसरूळ (ता. पन्हाळा) येथील प्रिया नानासाहेब पाटील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिची नुकतीच पोलीस उपअधीक्षक (डीवाय.एस.पी.) पदी निवड झाली आहे.